Agricultural Market Committee
कृषि उत्पन्न बाजार समिती दिंडोरीची स्थापना 5 जानेवारी 1989 रोजी होवून संस्थापक सभापती मा.श्री.गणपतरावजी गंगाधर पाटील साहेब यांचे नेतृत्वाखाली दिंडोरी बाजार समितीचे कामकाजास सुरवात झालेली आहे. या बाजार समितीचे कार्यक्षेत्र दिंडोरी तालुक्याचे असून एकूण 157 इतकी गांवे यामध्ये समाविष्ट आहेत.
बाजार समितीची उद्दिष्टे खालील प्रमाणे आहेत:
दिंडोरी बाजार समितीची स्थापना 1989 साली झाली असून गेल्या 35 वर्षांपासून या बाजार समितीने शेतकरी आणि ग्राहक यांच्यामध्ये सेतू म्हणून कार्य केले आहे. आरंभी केवळ निवडक शेतमालाच्या खरेदी-विक्रीसाठी स्थापन झालेल्या या बाजार समितीने आता 74 प्रकारच्या शेतमालाच्या व्यवहारांचे नियमन करून शेतकर्यांना त्यांच्या मालाची योग्य किंमत मिळवून देण्याचे कार्य केले आहे.
बाजार समितीच्या मुख्य व दुय्यम बाजार आवारांचे एकूण 14 हेक्टर 76 आर क्षेत्र असून मुख्य बाजार आवार दिंडोरी व उप बाजार आवार क.वणी व मोहाडी येथे स्वत:च्या मालकीच्या कार्यालयीन इमारती आहेत. दिंडोरी व क.वणी येथे 50 टनी इलेक्ट्रॉनिक वजन काटे, धान्य मार्केटसाठी इलेक्ट्रॉनिक काटे, शेतकरी विश्रामगृह, शौचालय, पिण्याच्या पाण्याची सुविधा, सेल हॉल आदी सुविधा उपलब्ध आहेत.
दिंडोरी कृषि उत्पन्न बाजार समिती
निळवंडी रोड, दिंडोरी,
ता. दिंडोरी, जि. नाशिक - 422202
स्थापना: ५ जानेवारी १९८९
फोन: (02557) 221097
उपबाजार आवार (वणी): (02550) 320542
ई-मेल: am_dindori@msamb.com
कार्यालयीन वेळ: सोमवार-शनिवार, सकाळी 10:00 ते संध्याकाळी 6:00